♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चिखली बाजार समितीला ‘ अच्छे दिन ‘ आणण्यासाठी सज्ज व्हा – सहकार परिवर्तन पँनलच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी आ. श्वेताताई महाले यांचे आवाहन

MH 28 News Live, चिखली : शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि प्रगतीसाठी स्थापन झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उद्देशाला हरताळ फासून अनागोंदी कारभार करणाऱ्या लोकांना शेतकरी बांधव कंटाळले असून बाजार समितीला राजकारणाचा अड्डा बनवणार्यांना शेतकरी, व्यापारी, हमाल – मापारी सगळे मिळून या निवडणुकीत धडा शिकवणार आहेत. मात्र यासाठी आपली सुध्दा पूर्ण तयारी आवश्यक असून शेतकऱ्यांना ‘ अच्छे दिन ‘ आणण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन आ. श्वेताताई महाले यांनी केले. शनिवार, दि. २२ एप्रिलला अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील सहकार परिवर्तन पँनलच्या प्रचाराचा नारळ डोंगरशेवली येथील श्री सोमनाथ महादेव मंदिरात आ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते फोडण्यात आला, यावेळी त्या बोलत होत्या.

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना व रयत क्रांती संघटनेच्या सहकार परिवर्तन पँनलने सर्व १८ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर डोंगरशेवली येथील श्री सोमनाथ महादेव मंदिरात झाला. आ. श्वेताताई महाले यांनी भगवान सोमनाथाचे पूजन करून व नारळ फोडून प्रचाराचा श्रीगणेश : केला. यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख ऋषीं जाधव, भाजपा ता. अध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ, शेतकरी नेते समाधान कणखर शिवसेना ता. अध्यक्ष ऍड लहाले, भाई विजय गवई नेते कवाडे गट, पंडितरावं देशमुख शहराध्यक्ष भाजपा चिखली, संतोष काळे पाटिल युमो. अध्यक्ष, वीरेद्र वानखेडे, अंकुशराव तायडे,भास्करराव आडळकर, बंडू अंभोरे, अरुण पाटिल, लक्षुमन शेळके, दिगंबर जाधव, अनमोल ढोरे, पंजाब देशमुख, दिपक मुरकुटे, ज्ञानेश्वर पवार , रितेश पवार, सचिन गरड यांच्यासह सहकार परिवर्तन पँनलचे उमेदवार, भाजप, शिवसेना, शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना व पिरिपाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

सहकाराचा स्वाहाकार करणाऱ्यांच्या तावडीतून चिखली बाजार समितीला सोडवूया – आ. श्वेताताई महाले

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य तो भाव मिळावा आणि आपला कृषीमाल विक्रीसाठी बाजार समितीच्या मार्केट यार्ड मध्ये घेऊन आलेल्या शेतकरी बांधवांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केली आहे. मात्र चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजवर काँग्रेस व त्यांच्या मित्र पक्षांनी अनेक प्रकारे गैरकारभार करून बाजार समितीच्या या उद्देशालाच हरताळ फासण्याचा आरोप आमदार श्वेताताई महाले यांनी यावेळी बोलताना केला. नियमबाह्य पद्धतीने कारभार व निधीचा दुरुपयोग करून आतापर्यंतच्या संचालक मंडळांनी मनमानी कारभार केला, त्यामुळे शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे आमदार श्वेताताई महाले म्हणाल्या. अशाप्रकारे सहकाराचा सहकार करणाऱ्या या सर्व लोकांच्या तावडीतून कृषी उत्पन्न बाजार समितीला सोडवून या ठिकाणी शेतकऱ्यांचे हित साधणाऱ्या सर्वसामान्य व तळमळीच्या कार्यकर्त्यांना संचालक मंडळावर शेतकरी मतदार निवडून पाठवतील असा मला दृढ विश्वास असल्याने सहकार परिवर्तन पँनलच्या विजयाची आपल्याला पूर्ण खात्री असल्याचे आ. श्वेताताई महाले म्हणाल्या.

शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेना सहकर परिवर्तन पँनलमध्ये – ऋषी जाधव

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक उपयुक्त योजना राबवत आहे. यापैकी अनेक योजनांचे लाभ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळू शकतात. परंतु, चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजवर भ्रष्ट संचालक मंडळाच्या कारभारामुळे हे लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहचले नाही, हे चित्र बदलावे आणि शेतकऱ्यांचे हित साधले जावे यासाठी शिवसेना सहकार परिवर्तन पँनलमध्ये सहभागी झाल्याचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख ऋषी जाधव यांच्या यावेळी बोलताना केले.

पिरिपाच्या माध्यमातून अनुसूचित समाज सहकार परिवर्तन पँनलच्या पाठीशी – भाई विजय गवई

चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती जमातीमधील शेतकरी बांधवाची संख्या देखील लक्षनिय प्रमाणात आहे. या समाजाला आजपर्यंत काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी केवळ वापरून घेतले. मात्र, आ. श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वाखालील सहकार परिवर्तन पँनलने अनुसूचित जाती जमातीच्या प्रश्नांची दखल घेतली, त्यामुळे पिपल्स रिपब्लिकन पार्टी या पँनलच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे प्रतिपादन पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाई विजय गवईयांनी केले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129