लोणार येथे वाईन शॉपच्या गोडाऊनला आग; लाखोंचे नुकसान
MH 28 News Live, लोणार : येथील दिनकर डोईफोडे यांच्या वाईन शॉपीला लागून पाठीमागे त्यांचे गोडाऊन आहे त्या गोडाऊनमध्ये दि. १५ मेला आग लागली. या दुर्घटनेत लाखो रुपये किमतीचा ऐवज व महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली.
सोमवारी सकाळी ८ वाजे दरम्यान दिनकरराव डोईफोडे यांना धूर निघत असल्याचे दिसून आले. त्यांनी गोडाऊन जवळ जाऊन आता बघितले असता आता आग लागलेली होती. बघता बघता त्या आगीने रोद्र रूप धारण केले. डोईफोडे यांनी तात्काळ नगरसेवक संतोष मापारी यांना या बाबत माहिती दिली. मापारी यांनी तात्काळ अग्निशमन दलाची गाडी बोलावून घेत स्वतः त्या ठिकाणी आग विझवण्यासाठी शर्थीचे पर्यंत केले. अग्निशमन दलाचा बंब तात्काळ आल्याने ताबडतोब आगीवर नियंत्रण मिळवता आले परंतु, तरी देखील या आगीमध्ये २०१८ पासून चे १३ मे २०२३ पर्यंतचे दारूबंदी विभागाचे व एक्ससाईडचे तपासणी साठी ठेवलेले वही खाते जळून खाक झाले तसेच पूठयाचे साहित्य १ लाख रुपये, सोलर पंपाचे साहित्य १ लाख ७० हजार रुपये, पी व्ही सी पाईप आणि फर्निचर ४० हजार रुपये, इलेक्ट्रिक मोटार पंप १० हजार रुपये, शेतीचे पाईप १२ हजार ५०० रुपये असा एकूण ३ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा माल जळून खाक झाला. याशिवाय महत्वाची कागदपत्रे देखील जळाली. नानासाहेब डोईफोडे, आरोग्य अधिकारी अशोक नीचंग, तलाठी अशोक सौदर, अनिल मापारी, दिलीप मापारी, अशोक मादनकर, विकास नेवरे, सानप यांनी दिनकर डोईफोडे यांच्या वाईन शॉपच्या गोडाऊनला लागलेली आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button