
विष प्राशन केलेल्या त्या तरुणीचा अखेर मृत्यू
MH 28 News Live, मोताळा : ५ दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या २० वर्षीय तरुणीचा काल, २४ मार्चला रात्री साडेआठच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मोताळा तालुक्यातील तालखेडमध्ये या तरुणीने विष घेतले होते.
दिव्या अमरसिंग परमार (रा. तालखेड) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. २० मार्चला सकाळी तिने राहत्या घरी विष घेतले होते. नातेवाइकांच्या ही बाब लक्षात येताच तिला उपचारासाठी लध्दड हॉस्पिटलमध्ये सकाळी साडेअकराच्या सुमारास दाखल केले होते. उपचारादरम्यान काल रात्री तिचा मृत्यू झाला. ५ दिवस तिच्यावर उपचार सुरू होते
डॉ. दीपक लध्दड यांनी तपासणी करून मृत घोषित केले. मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. तिने विष का घेतले, हे अद्याप कळू शकले नाही. तरुणी सामान्य कुटुंबातील होती. आई- वडील शेती करतात. एक लहान भाऊ आहे. बुलडाणा शहर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.



