
पर्यटनामध्ये ‘ काळ ‘ ठरले अघोरी धाडस; स्टंटबाजीच्या नादात गेला तरुणाचा जीव
MH 28 News Live, मेहकर ( रवींद्र सुरूशे ) पर्यटन स्थळी गेल्यानंतर आपल्या सुरक्षिततेची काळजी घेऊन त्या स्थळाचा आनंद घेण्याऐवजी अघोरी धाडस करणे हे जीवावर बेतू शकते. अशीच घटना मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे घडली असून येथील या पर्यटन स्थळावर आपल्या मित्रांसह गेलेला २२ रोशन मुरारी इंगळे ( रख. भखनखेड, तख. चिखली ) हा युवक त्या तलावामध्ये बुडून मरण पावला. आहे ही घटना दि. २२ जून रोजी घडली. या युवकावर काळाने घातलेल्या घाल्यामुळे भानखेड या राहत्या गावावर शोक काळा पसरली आहे.
तालुक्यातील या विवेकानंद स्मारकावर दिनांक 22 जून रोजी दुपारी दोन वाजता लक्ष्मण गजानन इंगळे,वय 22 वर्ष, आदेश किशोर इंगळे, 21वर्ष,ऋतिक भारत सोनूने वय वर्षे 23,अनिकेत गणेश सुरडकर वय वर्ष 24, रोशन मुरारी इंगळे वय वर्ष 20, सर्व राहणार भानखेड ता. चिखली जिल्हा बुलढाणा येथील युवक कन्याकुमारी परिसर पाहण्यासाठी आले असता. नौका विहार करताना नावे मध्ये काही मुली सुद्धा होत्या.त्यातील रोशन मुरारी इंगळे, वय वर्ष 20 राहणार भानखेड,व आदेश किशोर इंगळे वय वर्ष 21या दोन तरुणांनी स्मारक बेटाकडून हिवरा आश्रम बेटाकडे नौका येत असताना बेटाच्या मागे 50 फूट अंतरावर नौका चालू असताना नौका चालक खराटे यांचे काही न ऐकता चालू नावेतून उड्या टाकल्या. त्यावेळी आदेश इंगळे या युवकाला वाचवण्यात नौका चालक गुलाब कांबळे यांनी प्रयत्न करून त्यांना वाचवले. परंतु रोशन इंगळे हा तरूण पाण्यात बुडाला.
या युवकांनी चालू नावेतून उड्या टाकल्या ही फक्त त्यांची मुलींना बघून स्टंटबाजी असे स्थानिक लोकांकडून प्रत्यक्ष दर्शनी बोलल्या जात आहे.या घटनेची माहिती प्रशासनाला मिळताच तात्काळ साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्या पोलीस प्रशासनाने मेहकर तहसील तहसीलदार यांनी शोध मोहीम सुरू केली,परंतु दोन ते तीन तास शोध घेऊन सुद्धा रोशन इंगळे यांचा मृतदेह मिळून आला नाही. सायंकाळ झाल्यामुळे संबंधित प्रशासनाने शोध मोहीम थांबवण्यात आली आहे.रोशन इंगळे यांचा मृतदेह कधी बाहेर काढणार याबद्दल प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळाली नाही.