वृत्त विश्लेषण – समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातामागे ‘ महामार्ग संमोहन ‘ …? ३ महिन्याच्या संशोधनातून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी शोधलं कारण
MH 28 News Live : तुम्ही कधी ‘महामार्ग संमोहन’ हा प्रकार कधी ऐकला का ? नसेल ऐकला तर ऐका … जेव्हा एखादा महामार्ग सरळ एका रेषेत असतो .. कोणत्याच अड्थड्यासह त्या महामार्गावर तुमची गाडी सरळ एकमार्गे एकाच वेगात अनेक मिनिटे धावत असते… अशा परिस्थितीमध्ये तुमच्या शरिराची हालचाल स्थिर होते, तुमचा मेंदूपण क्रियेच्या प्रक्रियेसाठी सक्रिय नसतो. त्या मानवी स्थितीला ‘महामार्ग संमोहन’ असे म्हणतात. हा प्रकार समृद्धी महामार्गावर चालकांसोबत घडत आहे. समृद्धी महामार्गावर गाडी चालवतांना अनेक चालक हे ‘महामार्ग संमोहनाचे’ बळी ठरले असून अपघाताच्या काही सेंकंद आधी त्याच्या मेंदूने व शरीराने जी हालचाल किंवा क्रिया करायला हवी ती वेळेत न केल्याने अपघात झाले आहेत. नागपूरच्या व्हीएनआयटी संस्थेच्या सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेच्या ट्रांसपोस्टेशन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनात ही माहिती पुढे आली आहे. ‘महामार्ग संमोहन’ ३३ टक्के अपघाताला कारणीभूत ठरल्याचे त्यांनी आपल्या अहवालात दिले.
प्रफुल्ल मडधे, प्रतीक गजलेवार, विनय राजपूत, आयुष्य दूध बावरे या एमटेकच्या विद्यार्थ्यांनी समृद्धी महामार्गावरचे अपघात कमी करण्यासाठी काही महत्वाच्या सूचना सुचवल्या आहे. महामार्ग संमोहनापासून वाचण्यासाठी चालकाला मेंदु सक्रिय अवस्थेत ठेवण्यासाठी काही ठराविक अंतरावर वेगवेगळे साईनबोर्ड लावणे गरजेचे असल्याचे सुचवले ज्यामुळे ते साईबोर्ड बघतांना चालकाचा मेंढु सक्रिय राहील. सोबतच लेनवाईस स्पीड साईन बोर्ड, फीड बॅक साईन बोर्ड, स्पीड कॅमेरा, सिसिटीव्ह ज्यामुळे सतत चालक वाहन चालवतांना स्वताला सक्रिय ठेवेल व नियमाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेईल.
लेन कटिंग’ हे समृद्धी महामार्गावर अपघाचे आणखी एक प्रमुख कारण आहे. समृद्धी महामार्गावर तीन पदरीचे दोन स्वतंत्र ट्रॅक आहेत. त्यामुळे यावर सामोरासमोरून अपघाताचा प्रश्न नाही. मात्र आजवर झालेले बहुतांश अपघात हे साईड डॅशमुळे झाले आहेत. समोरच्या वाहनाचा चालक आपली लेन सोडून दुसऱ्या लेनवर जाताना नियमाचे पालन करत नाही. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या सुसाट वाहनासाठी समोरच्या वाहनांची ही अनपेक्षित मुहमेंन्ट असते. त्यातच महामार्ग संमोहनची क्रिया काम करत असल्याचे चालकाला सतर्क व्हायला एका सेकंदाचीही संधी मिळत नसल्याने साईड डॅश होतो व त्यानंतर भीषण अपघात होत असल्याचे या संशोधनात पुढे आले. आजवर झालेल्या अपघातात ४० टक्के या साईड डॅशमुळे झाले आहेत.
समृद्धी महामार्गावर ३० टक्के छोटी वाहने व २० छोटी मालवाहू वाहने वेगमर्यादा ओलांडत असल्याचे पुढे आले. त्यातच ५१ टक्के ट्रकचालक लेन फॉलो करत नसल्याचे पुढे आले . त्यातच समृद्धी महामार्गावर वळण मोजके असली तरी त्यांचा मात्र घेरा मोठा असल्याचे चालक सरळ रोड समजून वाहन सरळ रेषेत पुढे नेतो, त्यामुळे चालकांकडून लेन फालो न झाल्याने देखील अपघात झाल्याचे संशोधनात पुढे आले. याला असिव्ह ड्राईव्ह असे म्हणतात हे ११ टक्के अपघाताला कारणीभूत ठरले आहे. कमजोर किंवा कालबाह्य टायर वापरले जात असल्याने सिमेंट रोड वर टायर फुटणे हे देखील ३४ टक्के अपघाताला कारणीभूत ठरले आहे. सोबत काही कारणाने चालकाचे लक्ष विचलित झाल्याने २४ टक्के अपघात झाले तर मोबाईलचा वापर ८ टक्के अपघाताला कारणीभूत ठरला. या सर्वांमध्ये अतिवेग हा कॉमन फॅक्टर असल्याचे या संशोधनात दिसून आले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button