असं काय म्हणाले भुजबळ पवारांबद्दल, की ज्यामुळे दोघे आले आमनेसामने; वाचा सविस्तर.
MH 28 News Live : आजपासून २४ वर्षांपूर्वी जेव्हा काँग्रेस पक्षाने बाहेर काढले त्यावेळेला शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाची स्थापना केली. पवार जर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक असतील तर मी राष्ट्रवादी काँग्रेसचा महाराष्ट्राचा पहिला प्रदेशाध्यक्ष आहे शरद पवारांचा उजवा हात म्हणून मी काम पाहिले असल्याने माझा देखील पक्षाच्या उभारणीत महत्त्वाचा वाटा आहे अशा आशयाचे विधान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी आज केले. नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात भाषण करताना ते बोलत होते. शरद पवार यांच्याशी भुजबळांनी स्वतः ची केलेली तुलना करून थेट आमनेसामनेची लढाई सुरू झाल्याचे संकेत दिले असल्याची चर्चा राज्यातील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर आहेत. याचवेळी कळवणला शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी छगन भुजबळ बोलत होते. गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्र्रवादी पक्षाच्या चिन्हांवरून वाद सुरु असून निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर थेट शरद पवार निवडणूक आयोगाकडे तहान मांडून होते. यावर छगन भुजबळ यांनी निशाणा साधला आहे. पवार साहेब म्हणाले होते की मी काही कोर्ट कचेरी करणार नाही. पण आता कालपासून बघतो आहे, स्वतः पवार साहेबच तिकडे इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमध्ये गेले. ते सांगतात की राष्ट्रवादी पक्षाचा मी संस्थापक अध्यक्ष आहे, मग पवार साहेब मला तुम्हाला विचारायचं आहे कि, मी संस्थापक प्रांताध्यक्ष आहे की नाही ? ज्यावेळी शरद पवार काँग्रेसच्या बाहेर पडले. त्यावेळेला शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी उजवा हात म्हणून मी काम पाहिले, असेही भुजबळ म्हणाले.
आमचाही खारीचा वाटा…
शरद पवार सांगतात की मी राष्ट्रवादी पक्षाचा संस्थापक अध्यक्ष आहे, मग पवार साहेब मला तुम्हाला विचारायचं आहे कि, मी सुद्धा या महाराष्ट्राचा पहिला राष्ट्रवादीचा प्रांताध्यक्ष आहे, आमचाही पक्ष बांधणीत खारीचा वाटा आहे, असे प्रत्युत्तर मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button