♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार; खामगाव तालुक्यात पूरग्रस्त पुलावरून वाहून गेलेल्या वृद्धाचा शोध अद्याप सुरु

MH 28 News Live / खामगाव : गेल्या सात दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आता गंभीर स्वरूप धारण केले असून, काल सायंकाळी खामगाव तालुक्यातील घारोड गाव परिसरात ढगफुटी सदृश्य पावसाने कहर केला. या पावसामुळे घारोड नदीला अचानक पूर आला आणि त्याचा फटका गावातील नागरिकांना बसला.

याच दरम्यान, गावातील ७० वर्षीय शेतमजूर धोंडिबा इंगळे हे कामावरून परतत असताना नदीवरील पुलावरून जात असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते पुराच्या पाण्यात वाहून गेले. ही दुर्दैवी घटना गावात खळबळ उडवून देणारी ठरली आहे.

या घटनेची माहिती ग्रामस्थांनी तातडीने जिल्हा प्रशासनाला रात्रीच दिली होती. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळीपर्यंत प्रशासनाचा एकही अधिकारी किंवा एनडीआरएफची बचाव पथक घटनास्थळी पोहोचलेली नव्हती. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, धोंडिबा इंगळे यांचा शोध अद्याप सुरु असून ग्रामस्थ आणि स्थानिक स्वयंसेवक त्यांच्या शोधासाठी प्रयत्न करत आहेत. प्रशासनाच्या ढिसाळ प्रतिसादामुळे गावकऱ्यांमध्ये असंतोष पसरला असून, या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी होत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129