
साखरखेर्ड्यात सार्वजनिक शौचालयाअभावी महिलांची कुचंबना, करोडो रुपायांचा निधी मिळूनही गावात दोनच सार्वजनिक शौचालय; ते ही बंद
MH 28 News Live / साखरखेर्डा ( अमीन शाह ) : सिंदखेडराजा तालुक्यात सर्वात मोठे व महत्वाचा ऐतेहासिक गाव साखरखेर्डा असून या गावाला ३५ खेडी जोडलेली आहेत. येथे शाळा, महाविद्यालय, बैंक पोलिस स्टेशन, शासकीय व खाजगी रुग्णालय असून त्यामुळे दररोज बस स्टँड आणि आठवडी बाजार परिसरात लोकांची एकच गर्दी असते. दर शुक्रवारी येथे मोठा आठवडी बाजार भरतों. यात ग्रामीण भागातुन असंख्य पुरुष व महिला बाजार करण्यासाठी येतात मात्र, सार्वजनिक शौचालये बंद असल्यामुळे महिलांना फार त्रास सहन करावा लागत आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे सरपंच ज्योतीताई अमित जाधव यांच्या दारासमोरच आठवडी बाजार भरतों. येथे असलेले एकमात्र सार्वजनिक शौचालय देखभाली अभावी बंद अवस्थेत आहे. शौचालयासमोर असलेला केर कचरा हटवून बंद पडलेले शौचालय सुरु करण्यात यावे अशी मांगनी केली जात आहे.
दोन वर्षांपूर्वी येथील बस स्टँड जवळ असलेल्या पशु वैधकीय दवाखान्यात जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ जाधव यांच्या निधितुन नवीन शौचालय तय्यार करण्यात आले होते. मात्र, त्याला सुरू करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीला मुहूर्त सापडत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बाहेर गावावरुन आलेल्या प्रवासी महिलांना फार त्रास सहन करावा लागतो. सार्वजनिक शौचालय आठवडी बाजार परिसरात आहे परंतु, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे त्याच्या समोर केरकचरा घाण साचली आहे.
त्यामुळे ते बंद असून येथे महत्वाच्या ठिकाणी शौचालय नसल्यामुळे ग्रामीण भागातुन येणाऱ्या महिलांना व पुरुषांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने याकड़े लक्ष देऊन बंद असलेले शौचालय त्वरित सुरु करावे अशी मागणी केली जात आहे ,