♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

आ. आकाश फुंडकर यांच्या प्रयत्नातून आणखी एक भव्य़ वसतीगृह साकारणार.मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहासाठी १४ तर ग्रामीण रस्त्यासाठी १५ कोटी मंजूर

MH 28 News Live, खामगांव : आ.ॲड.आकाश फुंडकर यांच्या प्रयत्नातून गरीब गरजू विद्यार्थीनींसाठी शहरात आणखी एका वसतीगृहाच्या कामाला मंजूरात मिळाली असून त्यासाठी तब्बल १३ . ७० कोटी रुपयाचा निधी तर ग्रामीण भागातील महत्वाच्या रस्त्यासाठी १५ कोटी निधी मंजूर झाला आहे.

खामगांव शहरात मोठया संख्येने शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. त्यामुळे खामगांव तालुक्यातून तसेच जिल्हाभरातून विविध जाती धर्माचे विद्यार्थी विद्यार्थीनी शिक्षणासाठी येतात. सदरचे विद्यार्थी गोरगरीब असल्यामुळे त्यांना खामगांव येथे ये-जा करणे अथवा खोली घेऊन राहणे परवडत नाही. हीच बाब लक्षात घेऊन आमदार ॲड.आकाश फुंडकर यांनी याकडे विशेष् लक्ष दिले व गेल्या चार वर्षात् खामगांव शहरात व लगतच्या भागात पाच भव्य़ वसतिगृह बांधकामासाठी कोटयावधी रुपयांचा निधी खेचून आणला. यामध्ये खामगांव शहरालगतच्या वाडी येथे शासकीय तंत्रनिकेतनच्या आधीच्य मुलींच्या वसतीगृहासाठी अतिरिक्त् १ . ६२ कोटी, अल्पसंख्यांक मुलींच्या वसतीगृहासाठी रु. ४ . १३ कोटी, अल्पसंख्यांक मुलांसाठी वसतिगृह रु. ४ . १३ कोटी, घाटपुरी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह रु. ७ . ४८ कोटी, घाटपुरी येथे आदिवासी मुलांकरीता वसतिगृह रु. ३ . ७४ कोटी चा निधी खेचून आणून सदरची कामे पुर्ण झाली आहेत. त्यामुळे खामगांव शहरात येणाऱ्या विविध जाती धर्माच्या विद्यार्थी विद्यार्थीनींसाठी राहण्याची या वसतिगृहात सोय होणार आहे. सदरची कामे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “सबका साथ सबका विकास” या घोषणेप्रमाणे सुरु असून सर्वांचा समग्र व शाश्वत़ विकास करण्याचा ध्यास आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी घेतला आहे.

आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी अर्थसंकल्पातून मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहास मंजूरात मिळविली असून त्यासाठी जवळपास १४ कोटी रुपए मंजूर झाले आहे. लवकरच स्वतंत्र मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह घाटपुरी येथे होणार आहे. तसेच खामगांव शहरात विविध जाती धर्माचे विद्यार्थी विद्यार्थीनी शिक्षणासाठी येत असल्यामुळे त्यांना राहण्यासाठी वसतिगृहाची व्यवस्था करण्याचे दृष्टीने मागील ७ वर्षात ५ वसतिगृह बांधण्यात आले आहेत. यामध्ये खामगांवातील ग्रामीण भागातील जवळपास १४ कोटी रुपयाच्य महत्वाच्या रस्ता कामांचा समावेश आहे. यामध्ये पिंपळगांव राजा ते तरवाडी या रस्त्याच्या ५ कोटी रु., रामनगर ते किन्ही महादेव या रस्त्याच्या रु ४ कोटी ७५ लाख, राष्ट्रीय महामार्ग ६ ते पिंप्री गवळी गावाला जोडणारा रस्ता रु. ४ कोटी ७५ लाख या महत्वाच्या रस्त्याच्या कामांचा समावेश आहे. या रस्त्यांची दुरावस्था झालेली असून नागरीकांना वाहतुकीस अत्यंत त्रास होत असल्यामुळे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी अर्थसंकल्पातून सदरची कामे मंजूर करुन घेतली असून या रस्त्याच्या कामांमुळे या गावातील नागरीकांना वाहतुकीस त्याचा फायदा होणार आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129