♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

देऊळगाव राजात पकडला ६ लाखाचा ओला गांजा; आंतरजिल्हा टोळी टोळीचा पर्दाफाश

MH 28 News Live, देऊळगाव राजा : .देऊळगाव राजा जालना रस्त्यावरील देऊळगावराजा शहरांमधील धूमके कॉम्प्लेक्स या ठिकाणी गस्त घालणाऱ्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा व देऊळगाव राजा पोलिसांच्या पथकाने जिल्ह्यामध्ये चोरट्या मार्गाने विक्रीसाठी आणला जाणारा ६ लाख रुपये किमतीचा ओला गांजा हस्तगत केला. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास झालेल्या या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य दोन आरोपी फरार झाले. या कारवाईच्या निमित्ताने आंतर जिल्हा गांजा तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.

याबाबत थोडक्यात माहिती अशी आहे की, स्थागुशा पथक देऊळगाव राजा पोलीसांसह देउळगाव राजा ते जालना रोडवरील धुमके काम्प्लेक्स नाकाबंदी करीत असतांना रावसाहेब भगवान मलवत ( २९ ) रा. शिराळा ता. जाफ्राबाद जि. जालना व समाधान भगवान जाधव ( २९ ) रा. शिराळा ता. जाफ्राबाद जि. जालना या आरोपीच्या ताब्यातील टाटा टिगोर कंपनीच्या वाहन क्रमांक एम. एच. 28 ए. झेड – 0632 याची पाहणी केली असता त्यांच्या गाडीमध्ये पाढ-या रंगाच्या पोतडीत ४२ . ३६० किलोग्राम वजनाचा, ६ लाख रुपये किमतीचा ओला गांजा आढळून आला. याशिवाय दोन मोबाइल व एक चारचाकी वाहन असा एकूण ११ लाख २८ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी वरील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल झाला आहे. अन्य दोन आरोपी घटनास्थळावरुन फरार झाले आहेत. पुढील तपास सपोनी दत्तात्रय वाघमारे यांचेकडे देण्यात आला आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129