♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

ज्युनिअर क्रिकेट लीग लेदर बॉल क्रिकेट टूर्नामेंट- २०२२ मेहकर येथे आयोजन

MH 28 News Live, मेहकर : तालुक्यातील वयोगट १७ वर्षाआतील खेळाडूं साठी दर वर्षी प्रमाणे याही वर्षी ज्युनिअर क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन मेहकर तालुका क्रिकेट असोसिएशन व एम. इ. एस. क्रिकेट अकॅडमि यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले आहे.

येत्या मे महिन्यात होणाऱ्या सदर स्पर्धेत ४ संघ असून लीग पद्धतीने स्पर्धा होणार असल्याची माहिती मेहकर तालुका लेदर बॉल क्रिकेट संघटनेचे तालुका प्रमुख राहुल बाभुळकर व स्पर्धा आयोजक समिती श्याम बाभुळकर, अनिकेत लाडुकर यांनी दिली आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी १७ एप्रिल ला एम. इ. एस. क्रिकेट अकॅडमी मेहकर येथे दुपारी साडेचार वाजता आधार कार्ड सोबत हजर रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129