♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

ओबीसी, भटक्या व विमुक्त जाती, जमातींच्या विद्यार्थ्यांना ६४ नव्या कृषी व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी मिळणार शिष्यवृत्ती

MH 28 News Live : राज्यातील इतर मागास, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेषमागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नव्या ६४ व्यावसायिक, कृषी अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे.

राज्याच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत तसा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती इतर मागास,बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत नवीन ६४ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती सुरु करण्यात आली आहे. नवीन ६४ व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी महाडिबीटी प्रणालीवर मॅपींग करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

इतर मागास, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेषमागास प्रवर्गातील ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखापर्यंत मर्यादित आहे, त्यांच्या पाल्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. तसेच संबंधित विद्यार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असला व परराज्यात शिक्षण घेत असला तरी त्यास शिष्यवृत्ती/शिक्षण शुल्क/परीक्षा शुल्क लागू करण्यात आले आहे.

मागासवर्गीय, ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे रोजगार, स्वयंरोजगार, व्यावसायिक अभ्यासक्रमातून जीवनमान उंचावणे व त्यांना रोजगारसंधी उपलब्ध व्हाव्यात या हेतुने इतर मागास बहुजन कल्याण विभाग सतत प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

यापूर्वी राज्यात एकूण ६०५ अभ्यासक्रम होते आता एकूण ७३६ अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. त्यात २०२०-२०२१ सालापासून ४० तर २०२१-२०२२ पासून २४ अभ्यासक्रम नव्याने सुरु केल्याची माहितीही वडेट्टीवार यांनी दिली.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129