♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चिखली तालुक्यात पळसखेड सपकाळ येथे आढळला लम्पीचा रुग्ण; गायीला झाली लागण

MH 28 News Live, पळसखेड सपकाळ : चिखली तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथील शेतकरी राजेंद्र राजपूत यांच्या एका गायीला लंम्पी आजाराची लागण झाली आहे .१७ सप्टेंबर रोजी हा प्रकार लक्षात आल्याने गावातील शेतकरी धास्तावले आहेत.

तालुक्यासह संपूर्ण राज्यात थैमान घातलेल्या लम्पी आजारामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चिखली तालुक्यात लंम्पी आजार पाय पसरत असून त्याची लागण आता शहरी भागानंतर गाव खेड्यातील जनावरांना होत आहे. आधीच शेतकरी नैसर्गिक आपत्ती व पावसामुळे मोठ्या आर्थिक संकटात आहेत, त्यातच आता जनावरांवर आलेल्या लम्पी आजारामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे पशुपालकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सध्या ग्रामिण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाळीव जनावरांना लंपी आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे अनेक जनावरे मरण पावत आहेत. पळसखेड सपकाळ ,धोडप, डोंगरशेवली, करवंड, श्रीकृष्ण नगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाळीव जनावरांची संख्या आहे.त्यामुळे शासनाने तात्काळ यांची दखल घेऊन गावोगावी लसीकरण कॅम्प आयोजित करावे अशी शेतकरी वर्गातुन मागणी केली जात आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129