♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

राष्ट्रीय स्पर्धेत गायत्री मैंदला रजतपदक

MH 28 News Live, चिखली: गुलमर्ग, जम्मू आणि काश्मीर येथे ३ ते ८ जानेवारी २०२३ दरम्यान द्वितीय सब ज्युनिअर, ज्युनिअर अँड सिनिअर कर्लिंग नॅशनल चैनपेनशिप २०२२-२०२३ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत गायत्री मैंदने रजत पदक प्राप्त केले आहे.

या स्पर्धा इंटरनॅशनल ऑलिम्पिक, खेलो इंडिया व इंडियन ऑलिम्पिक यांच्या अधिपत्याखाली व कलिंग फेडेरेशन ऑफ इंडिया व जम्मू आणि काश्मीर कर्लिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आल्या होत्या.

सदर स्पर्धेत चिखली येथील गायत्री मैंद हिने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत सिनिअर मिक्स टीम मध्ये सहभागी होऊन गायत्री मैंद हिने रजत पदक प्राप्त केले. सदर स्पर्धेत एकूण ३०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत उत्तराखंडच्या संघाला स्वर्ण पदक, महाराष्ट्र संघाला रजत तर जम्मू आणि काश्मीर संघाला कांस्य पदक प्राप्त झाले आहे. यासाठी तीला आई, वडील, प्रशिक्षक व महाराष्ट्र कर्लिंग संघटनेचे सचिव शेख साबीर पुणे, योगेश शर्मा, तलवारबाजी प्रशिक्षक अक्षय गोलांडे, दिलीप यंगड, गोधरी सरपंच भारत जोगदंडे, प्रा. शरद इंगळे आदींनी मार्गदर्शन केले.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129