
चिखलीच्या नवनियुक्त ठाणेकरांनी घेतली पाटीलांसह सरपंच, उपसरपंचांची बैठक
MH 28 News Live, चिखली : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच व तंटामुक्ती समिती अध्यक्ष यांची सभा दि. २८ जानेवारी रोजी पोलीस ठाण्याच्या आवारात घेतली. आगामी सण उत्सव तसेच पदवीधर निवडणूक काळात घ्यावयाची खबरदारी याबाबत, शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवणे बाबत सूचना देण्यात आल्या. नवनियुक्त ठाणेदार विलास पाटील यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले.
तसेच कोणत्याही परिस्थितीत अनधिकृत विनापरवाना पुतळा स्थापन होणार नाही या दृष्टीने माहिती काढून अनधिकृत पुतळा संदर्भात घ्यावयाची दक्षता बाबत मार्गदर्शन करुन संबंधितांना नोटीस बजाविण्यात आल्या आहेत. पो. स्टे. परिसरात आगामी सण, उत्सव शांततेने सामंजस्याने पार पाडावेत, याबाबत चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले , सदर बैठकीस पो स्टे परिसरातील सर्व पोलीस पाटील, सरपंच, तनतामुक्ति अध्यक्ष हे मोठ्या संख्येने हजर होते.