♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

” लाडकी बहीण ‘ योजनेत जिल्ह्यातील तब्बल २४,८२८ अर्ज बाद; आयकर खात्याच्या माहितीवरून उत्पन्नाची पडताळणी सुरू

MH 28 News Live / बुलढाणा : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेत जिल्ह्यातील हजारो महिलांनी लाभासाठी अर्ज केले होते. मात्र, यामध्ये विविध कारणांमुळे २४,८२८ अर्ज अमान्य ठरवण्यात आले आहेत.

या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड प्रक्रियेत आता आयकर विभागाच्या माहितीचा आधार घेतला जात असून अर्जदार महिलांचे उत्पन्न तपासले जात आहे. यामध्ये दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्नापेक्षा जास्त असणाऱ्या अर्जदारांचे अर्जही बाद होणार आहेत. राज्य शासनाकडून गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना राबवली जात आहे. मात्र, काही अपात्र महिलांनीही अर्ज सादर केल्याचे निष्पन्न झाले असून प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे.

योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी प्रशासनाने आता ऑनलाइन पडताळणीसह आयकर विभागाशी माहितीची देवाणघेवाण सुरू केली आहे. त्यामुळे अपात्र अर्जदारांना योजनेपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, अर्ज बाद होण्यामागे चुकीची माहिती, अपूर्ण कागदपत्रे, उत्पन्न मर्यादेतील तफावत, तसेच अन्य तांत्रिक त्रुटी कारणीभूत ठरल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून महिला अर्जदारांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी आपली माहिती व कागदपत्रे अचूक व प्रामाणिकरीत्या सादर करावीत, जेणेकरून खऱ्या अर्थाने गरजू महिलांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचू शकेल. योजना अपात्र ठरलेल्या महिलांची यादी लवकरच ग्रामपातळीवरही प्रसिद्ध करण्यात येणार असून, अर्जदारांना पुनर्पडताळणीची संधी दिली जाईल का, याबाबतची अंतिम निर्णय प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129