♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

स्व. काकाजींचे शताब्दी पुण्यस्मरण

आम्हा भावंडांना घडविणारे शिल्पकार आमचे काकाजी श्रध्देय प्रभुलालजी भाला यांची आज १०० वी जयंती. स्व. काकाजींच्या जन्मशताब्दी निमित्ताने संयुक्त भाला परिवाराच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन.

१९३६-३७ मध्ये संघ संस्थापक प.पू.डॉ. हेडगेवार यांचा चिखलीला प्रवास झाला होता. त्यावेळी १५ ते २० लोकांची जी बैठक झाली त्या बैठकीला माड़झे वडील अध्देय बन्सीलालजी भाला हजर होते. वडीलांचं वय २८ वर्ष होतं आणि अध्देय काकाजी फक्त १२ वर्षांचे होते. ५-६ वर्ष वडीलांनी संघाचं काम केलं, पण त्यांना आवड होती आध्यात्मिक क्षेत्राची. त्यामुळे दिवसातील बराच वेळ पाठ-पूजा, भजन किर्तन, वाचन-मनन यामध्ये जायचा काकाजी सुध्दा धार्मिक वृत्तीचे होते परंतु त्यांना त्याच्या पेक्षा समाजकारण, राजकारणात जास्त आवड निर्माण झाली म्हणून वडीलांनी त्यांना संधकाम करण्यासाठी प्रवृत्त केले. मोठ्या भावाच्या इच्छेने आणि आज्ञेनुसार काकाजींनी शिक्षण पूर्ण करुन वयाच्या २०-२१ व्या वर्षी २-३ वर्षासाठी विस्तारक म्हणून जाण्याचे ठरवले आणि अकोट भागात संघाचे कार्य वाढवले. परत आल्यावर लग्न केले आणि १९४८ पासून घरच्या

भाला कुटुंबाचा इतिहास

माझे पणजोबा श्रध्देय सितारामजी हे गोविंदगढ जि. जयपूर (राजस्थान) येथे रहायचे. राजस्थान त्याकाळी बरेचदा अवर्षणग्रस्त राहायचा १८८० साली पणजोबांच्या सासरच्या मंडळींनी त्यांना व्यापारानिमित्त महाराष्ट्रात सोबत चलण्याचा सल्ला दिला. त्याकाळी वाहनांची सोय नव्हती पायी प्रवास करुन ३ महिन्याने चिखलीला पोहोचले. धान्याचा व्यापार सुरु केला. १०-१२ वर्षात दीड-दोन हजार रु. पुंजी जमवून राजस्थानला गेले, त्यांना श्रीराम व गोरुलाल नावाची दोन मुले होती त्यांची लग्ने झालीत. श्री, रामजींना रामेश्वर व बन्सीलाल अशी दोन मुलं तर गोरुलालजींना प्रल्हादी नावाची कन्या व प्रभुलाल हे पुत्र झाले. राजस्थानातील अवर्षण स्थितीत काही विशेष बदल न झाल्यामुळे आणि दक्षिणेकडे जाणारा रेल्वेमार्ग सुरु झाल्यामुळे यातायात सुलभ झाल्या कारणाने पणजोबा सितारामजींनी सर्वांना महाराष्ट्रात जाण्याचा सल्ला दिला. पण आजोबा गोरुलालजी आणि ४ थी पास झालेले माझे वडील बन्सीलालजी चिखलीला आले आणि वडीलांच्या मोठ्या भावाने (रामेश्वरजी) गोविंदगढलाच राहण्याचा निर्णय घेतला. आजी, आत्या प्रल्हादी आणि काका प्रभुलालजी सुध्दा तिकडेच थांबले, दुर्देवाने आत्या ६ वर्षाच्या आणि काकाजी २।। वर्षाचे असतांना आजीचे निधन झाले. त्यामुळे आत्या प्रल्हादी आणि काका प्रभुलाल यांचा सांभाळ कसा करावा हा प्रश्न समोर आला, म्हणून तातडीने बन्सीलालजींना १९२८ मध्ये चिखलीहून राजस्थानला बोलावून रेनवाल येथील धूत कुटूंबातील कन्या मनीबाई हिच्याशी विवाह करुन दिला. दिड दोन महिन्यांनी गोरुलालजी त्यांची दोन्ही अपत्ये आणि नवविवाहीत जोडपे (बन्सीलाल व मनीबाई) चिखलीला आले. नवविवाहिता आमची आई, मनीबाई, ६ वर्षाची नणंद व २।। वर्षाच्या दिराचा सांभाळ करु लागली. पुढे दोघांचे लग्न झाले आणि पुढील घटनाक्रम आपल्या समोर आहे.

व्यापाराकडे लक्ष देण्याचे ठरवले आणि मोठ्या भावाला मदत करु लागले. संघाचे काम करतांना बरेच अधिकारी प्रवासानिमित्त घरी यायचे त्यांच्या पासून प्रेरणा घेऊन शिक्षण, सहकार व आर्थिक क्षेत्रात काहीतरी अतूलनीय कामगिरी करण्याची भावना त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. इकडे मोठे भाऊ बन्सीलालजी यांची मुलेही मोठी होऊन व्यापारात मदत करु लागली. पण काकाजींना नेहमी वाटायचे की भावाच्या आणि माझ्या मुलांनी संघ संस्कार घेता घेता उच्च शिक्षीत व्हावे आणि त्या अनुषंगाने आम्हा भावंडांना सतत प्रोत्साहीत करायचे. त्याचाच परिणाम म्हणून माझे मोठे भाऊ देवराजजीच फक्त व्यापारात मग्न झाले त्यानंतर राधाकिसनजी वकील झाले. जुगलकिशोरजी बालरोग तज्ञ झाले, लक्ष्मीनारायण पोस्ट ग्रॅज्युएट झाले आणि काकाजींची परंपरा पुढे चालवण्यासाठी पूर्णकालीक प्रचारक म्हणून घर सोडले आणि सध्याही गेल्या ५७ वर्षापासून प्रचारक आहेत. बालमुकुंदजी भूलशाखाचे डॉक्टर झाले आणि मी बी. कॉम, डी.एम.एम. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. आम्हा ६ भावांपैकी ज्येष्ठचंधू सोडले तर बाकी पाचही तृतिय वर्ष शिक्षित असून आपापल्या भीगोलीक व कार्यक्षेत्रात सक्रीय आहोत. स्व. काकाजींच्या तीन मुलांपैकी घनश्यामजी वकील आहेत, प्रेमराजजींनी व्यापार आणि सामाजिक क्षेत्रात व्याप वाढविला आहे आणि राजेंद्र वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.

आम्हा सर्व भाऊ-बहिणींच्या जडणघडणीत जितका मोलाचा वाटा आई वडीलांचा आहे तितकाच मोठा वाटा स्व. काकाजींचा होता है अभिमानाने लिहावेसे वाटते. आई वडील आम्हाला कौटूंबिक व धार्मिक संस्कार द्यायचे तर काकाजी सतत सामाजिक आणि नैतिक शिक्षण द्यायचे.

संपूर्ण परिवार संघाशी जुडलेला असल्यामुळे संघाच्या उत्थान पतना सोबत कुटुंबाचाही उत्थान पतन होत गेला. आणिबाणीच्या काळात स्व. काकाजी १९ महिने नाशिकच्या जेलमध्ये होते. वडील वृध्दावस्थेकडे कलले होते, एक भाऊ प्रचारक, दोन भाऊ उच्च शिक्षण घेत होते आम्ही दोयं तीघ वयाने लहानच होतो त्यामुळे व्यवसाय चौपट झाला. घरात ताणतणाव वाढत गेला. एका घराचे दोन घर झाले घरात भिंत उभारल्या गेली व्यवसाय वेगळे झाले अशा अवस्थेतही बन्सीलालजी आणि प्रभुलालजी यांच्यात मनभेद कधीच झाले नाही त्यामुळे आमच्या पिढीला संयुक्त परिवारचे घटक आहोत ही घावना अधीक बळ देत गेली आणि ही भावना जशी आज आहे तशीच यापुढेही राहील. अशा अनुशासनप्रीय, कठोर पण तितक्याच मृद स्वभावाचे फक्त आमचेच नव्हे तर आपणा सर्वांचे ‘काकाजी’ आम्हाला व पुढच्या पिढीला सतत प्रेरणा देत राहतील हीच अपेक्षा आज आदरांजली समर्पित करतांना व्यक्त करतो. संघाच्या शताब्दी वर्षांरभी पू. काकाजींची शतकीय जयंती येणे हा दुर्लभ असा योग आहे. जय श्रीराम !

🙏🏻 शरद बन्सीलालजी भाला
▪️ तालुका संघचालक, चिखली

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129