♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

पीएफ खातेदारांसाठी दिलासादायक बातमी; १५ जुलैपर्यंत ८.२५ टक्के व्याज खात्यात जमा होणार

MH 28 News Live : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने देशातील पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. नव्या प्रणालीअंतर्गत देशभरातील सुमारे ३४ कोटी पीएफ खात्यांमध्ये १५ जुलैपर्यंत ८.२५ टक्के दराने व्याज जमा केले जाणार आहे. यासाठी अंदाजे १.४४ लाख कोटी रुपयांची रक्कम वितरित केली जाणार असून, याचा थेट लाभ कोट्यवधी सदस्यांना मिळणार आहे.

याशिवाय, पीएफशी संबंधित सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी ईपीएफओकडून नवीन केंद्रीकृत आयटी प्रणालीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या प्रणालीमुळे देशभरातील सर्व पीएफ खात्यांची माहिती एकाच केंद्रीकृत डेटाबेसमध्ये उपलब्ध होणार असून, सदस्यांना कोणत्याही ईपीएफओ कार्यालयातून विविध सेवांचा लाभ घेणे अधिक सोपे होणार आहे. ईपीएफओच्या या निर्णयामुळे व्याज जमा होण्याची प्रतीक्षा करणाऱ्या कोट्यवधी पीएफ खातेधारकांना मोठा दिलासा मिळाला असून, नव्या आयटी प्रणालीमुळे भविष्यातील सेवा अधिक कार्यक्षम आणि वेगवान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129