♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

जय बाबा बर्फानी…! जम्मू – श्रीनगर महामार्ग खुला होताच अमरनाथ यात्रेला पुन्हा वेग; ३,८८६ भाविकांचे प्रस्थान

MH 28 News Live : मुसळधार पावसामुळे दोन दिवस विस्कळीत झालेल्या अमरनाथ यात्रेला रविवारी पुन्हा वेग आला. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग अंशतः वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर जम्मूतील भगवती नगर बेस कॅम्पवरून ३,८८६ भाविकांची २५ वी तुकडी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथकडे रवाना झाली.

पहाटे २.५२ वाजता १७७ वाहनांच्या ताफ्यासह यात्रेकरूंनी बाल्टाल मार्गे प्रस्थान केले. मुसळधार पावसामुळे उधमपूर आणि रामबन जिल्ह्यात महामार्गाचे अनेक ठिकाणी नुकसान झाले होते. त्यामुळे दोन दिवस वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. मात्र समरोली येथील देवल पुलाजवळ एकेरी वाहतूक सुरू केल्याने यात्रेकरूंना पुढे जाण्याचा मार्ग उपलब्ध झाला. महामार्गावरील दुरुस्तीचे काम अद्याप सुरू असून, हलक्या वाहनांना प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. यात्रेकरूंचा ताफा मार्गस्थ झाल्यानंतर जम्मूकडे जाणारी वाहतूकही टप्प्याटप्प्याने सुरू केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान, अवजड वाहनांना एका दिवसाआड महामार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुढील काही दिवस हवामान प्रतिकूल राहण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी प्रवासापूर्वी महामार्गावरील ताज्या परिस्थितीची माहिती घेण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. ३ जुलैपासून सुरू झालेल्या ५७ दिवसांच्या अमरनाथ यात्रेत आतापर्यंत साडेचार लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र गुहेचे दर्शन घेतले असून, ही यात्रा २८ ऑगस्ट रोजी समाप्त होणार आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129