♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

डोणगावात सरपंच – उपसरपंच निवडणुकीत झाला ‘ घोडेबाजार ‘, परस्परांचे मतदार फोडून काँग्रेस – राष्ट्रवादी आणि शिवसेनेने केला शह – काटशह

MH 28 News Live, डोणगाव : बुलडाणा जिल्हातील सर्वात मोठी ग्राम पंचायत असलेल्या राजकीय संवेदनशील ग्राम पंचायत निवडणुकीचा निकाल लागून तब्बल १६ महिन्या नंतर सरपंच व उपसरपंच मिळाला. मात्र जे निकाल लागले त्यात दोन्ही पॅनेलचे एक एक सदस्य फुटल्याने अनपेक्षित निकाल लागल्याने त्याची चर्चा रंगली.

डोणगाव येथील वार्ड क्रमांक एक मधील एक सदस्य पदाचा वाद नागपूर खंडपीठ ते सर्वोच्च न्यायालयात गेला. ज्यात न्यायालयाने सलमा बी सय्यदनूर अतार यांना विजयी घोषित करत सरपंच पदाची निवडणूक घेण्यासंबंधी सूचना दिल्या. सरपंच पदाचे आरक्षण ओबीसी होते। मात्र निवडणूक आयोगाने ते खुल्या प्रवर्गात केल्याने २९ एप्रिल रोजी निवडणूक निकाल लागला.

डोणगाव येथील ग्राम पंचायत सदस्य संख्या १७ होती. ज्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे ९ तर शिवसेना व शिवसेनेचे बंडखोर मिळून ८ असे सदस्यी बलाबल होते. त्यामुळे सरपंच पदाची माळ काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या गळ्यात पडेल असे वाटत होते. मात्र निकाल लागले तेव्हा शिवसेनेच्या रेखा रवी पांडव यांना ९ तर राष्ट्रवादी व काँग्रेसचे चरण आखाडे यांना ८ मते मिळाली. उपसरपंच पदासाठी राष्ट्रवादी – काँग्रेसचे शाम प्रल्हाद इंगळे यांना ८ मतदान पडले तर शे मदन शे दाऊद यांना ७ मतदान पडले तर एक मत अवैध झाले.

एकीकडे येथील ग्राम पंचायतीची निवडणूक ही प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून संबोधली जाते. अश्यात राजकीय दृष्या संवेदनशील असलेल्या डोणगावात सरपंच – उपसरपंच पदाचे निकाल सुद्धा खूपच वेगळे लागल्याने त्याची चर्चा रंगली. राष्ट्रवादी व काँग्रेसकडे ९ सदस्य असतांना त्यांना ८ मतदान पडते तर शिवसेने कडे ८ सदस्य असतांना त्यांना ७ मतदान पडते ज्याने एक मेकाचा गेम करण्यात हा गेम झाल्याची चर्चा रंगत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129