♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

कळंबेश्वरच्या लेकीचा आशियाई तलवारबाजी स्पर्धेत डंका. मुंबई विमानतळावर झाले जंगी स्वागत

MH 28 News Live , मेहकर : तालुक्यातील कळंबेश्वर येथील तुळशीदास नारायण भराड यांची नात कुमारी कशीष दीपक भराड आणि वैदेही लोहिया यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना उजबेकिस्तानातील ताश्कंद येथे नुकत्याच झालेल्या कॅडेट गटातील आशियाई तलवार बाजी स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत कांस्यपदकांची कमाई केली.

 

ताश्कंद येथे २४ फेब्रुवारी दरम्यान आशियाई स्पर्धेत कशीष भराड हिने मुलींच्या १७ वर्षांखालील वयोगटात सेंबर प्रकारात उपांत्यपूर्व फेरीत जॉर्डनच्या खेळाडूंवर ४५/२८ अशा गुणफरकाने मात करत उपांत्य फेरी गाठली. मात्र, तिला उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला.तथापि,कशीषने त्याआधीच कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केला होता . कशीषपाठोपाठ वैदेही लोहिया हीनेही जबरदस्त कामगिरी करताना या स्पर्धेत कॅडेट गटात भारताला दुसरे कांस्यपदक जिंकून दिले. वैदेहीने मुलींच्या १७ वर्षांखालील वयोगटांत कझाकिगस्तान आणि इराणच्या खेळाडूंना धूळ चारली.मात्र , उपांत्य फेरीत उजबेकिस्तानच्या खेळाडूविरुद्ध तिला पराभव पत्करावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले .उजबेकिस्तानात पराक्रम करत पदकांची लयलूट करणारे कशीष भराड आणि वैदेही लोहिया यांचे रात्री दिल्लीहून औरंगाबादेत आगमन झाले . त्यावेळी या दोन्ही पदक विजेत्यांचे औरंगाबाद येथील विमानतळावर चाहत्यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी आमदार अंबादास दानवे, राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव उदय डोंगरे, जिल्हा संघटनेचे सचिव दिनेश बंजारे, सागर मगरे, स्वप्नील तांगडे,अजय त्रिभुवन व समस्त गणमान्य मंडळी उपस्थित होते. कुमारी कशिश हिने केलेल्या कामगिरीचे तालुक्याचे नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे नाव आशियाई देशांमध्ये पोहचले आहे. तिच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कशिश भराडला ऑलिम्पिकमध्ये खेळायचय

.उजबेकिस्तानमध्ये आशियाई ज्युनिअर व कॅडेट गटातील तलवारबाजी स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या कशिष भराड व वैदेही लोहिया यांचे ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न आहे. ● कशिष भराड हिची ही तिसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती.तिने गतवर्षा इजिप्त येथे कॅडेट गटातील जागतिक अजिंक्यपद आणि २०१ ९ मध्ये जॉर्डन येथे आशियाई स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. कशिषने आतापर्यंत राष्ट्रीय स्पर्धेत १८ मेडल्स जिंकून दमदार कामगिरी केली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129