♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

‘ हिंदी ‘ वरुन जुंपले बाँलिवुड आणि टाँलिवुडमध्ये ‘ स्टार वाँर ‘… अजय देवगण आणि सुदीपनी चालवले परस्परांवर शाब्दिक बाण

MH 28 News Live : हिंदी आणि दाक्षिणात्य भाषांमधील जुन्या वादाची ठिणगी आता चित्रपट उद्योगामध्येही पडली आहे. याला कारणीभूत ठरली आहे ती साऊथ चित्रपट उद्योगातील हिट खलनायक किच्चा सुदीपच्या व्हिडिओ मुलाखतीनंतर. या व्हिडिओमध्ये सुदीप यांनी हिंदी भाषा ही आपली राष्ट्रभाषा नसल्याचे म्हटले आहे. आता किचा सुदीपच्या या वादग्रस्त विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावर अजय देवगणने दाक्षिनात्य अभिनेत्याला चोख प्रत्युत्तर देत प्रतिक्रिया दिली आहे.

अजयची देवगणची प्रतिक्रिया

अजय देवगणने ट्विट करून कन्नड अभिनेता सुदीपला खडेबोल सुनावले आहेत. अजय म्हणतो, ‘किच्चा सुदीप, माझ्या भावा, जर तुमच्या मते हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही तर तुम्ही तुमच्या मातृभाषेतील चित्रपट हिंदीत डब करून का प्रदर्शित करता ? हिंदी आमची मातृभाषा आणि राष्ट्रभाषा होती, आहे आणि नेहमीच राहिल. जन गण मन.’

सुदीपचे मोठे वक्तव्य

‘KGF 2’ आणि ‘RRR’ सारखे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर साऊथ आणि बॉलीवूडमधील मनोरंजन उद्योगात एक वेगळीच चर्चा सुरू झाली. बॉलीवूडचे चित्रपट आणि साऊथचे चित्रपट यांची तुलना होत असतानाच भाषेवरही प्रश्न उपस्थित झाले. पॅन इंडिया स्तरावर वेगवेगळ्या भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित होत असताना. अलीकडेच साऊथ स्टार किचा सुदीपने एका कार्यक्रमात, हिंदी आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही आणि बॉलीवूड तामिळ आणि तेलगूमध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपडत आहे, असे मोठे वक्तव्य केले होते.

सुदीप म्हणाला होता की, पॅन इंडिया चित्रपट कन्नडमध्ये बनत आहेत, मला त्यावर एक छोटीशी दुरुस्ती करायची आहे. हिंदी ही आता राष्ट्रभाषा राहिलेली नाही. बॉलिवूडमध्ये आज पॅन इंडिया चित्रपट बनत आहेत. ते तेलुगू आणि तमिळ चित्रपटांचे रिमेक बनवत आहे, पण असे असूनही त्यांना संघर्ष करावा लागत आहे. आज आम्ही ते चित्रपट बनवत आहोत जे जगभरात पाहिले जात आहेत, असे विधान त्याने केले होते. यानंतर चांगलाच गदारोळ माजला.

सुदीपचे हिंदी चित्रपट

अजय देवगणच्या प्रतिक्रियेला किच्चा सुदीप काय प्रत्युत्तर देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुदीपने स्वतः अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने फूंक, रन, फूंक 2, रक्तचरित्र आणि दबंग 3 मध्ये काम केले आहे. 2019 मध्ये दबंग 3 रिलीज झाला होता ज्यामध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत होता आणि सुदीप त्यात खलनायकाच्या भूमिकेत होता. आता तो येणाऱ्या काळात हिंदी चित्रपटात काम करतो का पाहण्यासारखे आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129