७५ वर्षांवरील वृध्दांना आता एसटी प्रवास मोफत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
MH 28 News Live : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेसमधून मोफत प्रवास करण्यात आला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. राज्य सरकारने तीन महत्वाच्या घोषणा करत जनतेला दिलासा दिला आहे. सरकारी कर्मचारी, ७५ वर्ष पूर्ण केले ज्येष्ठ नागरिक, गोविंदा पथकातील गोविंदाबाबत महत्वाचे निर्णय घेतले.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तास्थापना, गटबाजी या राजकीय नाट्यानंतर आज शिंदे सरकारचे पहिले अधिवेशन आहे. यावेळी पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधक सभागृहात आमनेसामने येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केली. यापुढे ७५ वर्षावरील नागरिकांना एसटी बसचा मोफत प्रवास असणार आहे. यापूर्वी नागरिकांना प्रवासात ५० टक्के सवलत होती; परंतु आता यापुढे जे नागरिक स्त्री किंवा पुरुष १५ ऑगस्ट २०२२ रोजी ७५ वर्ष किंवा त्यावरील असतील त्यांना आता एसटी बसचा मोफत प्रवास असणार आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button