♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

९०० वर्षांपासून भक्कमपणे उभा असलेला इतिहासाचा साक्षीदार ढासळतोय. विजयदुर्ग सागरी किल्ला बनलाय पर्यटक व शिवप्रेमींसाठी जोखीम

MH 28 News Live : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेल्या देवगडमधील विजयदुर्ग किल्ल्याची गेले काही वर्षे बुरुज ढासळत आहेत. 14 ऑगस्ट रोजी विजयदुर्ग किल्ल्याचा दर्या बुरुजाच्या समुद्राकडील खालील बाजूची तटबंदी सतत होत लाटांच्या मारांमुळे ढासळली आहे. विजयुदर्ग किल्ल्याची तटबंदी ढासळण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यातच त्याकडे पुरातत्व विभाग दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

विजयदुर्ग किल्ल्याच्या पश्चिम बाजूला म्हणजेच समुद्राकडील बाजूला दर्या बुरुज तटबंदी 14 ऑगस्टला समुद्राच्या लाटांमुळे ढासळली. ही ढासळलेली तटबंदी मच्छीमारांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली. त्यामुळे तटबंदी ढासळली हे समोर आलं. तटबंदीचा काहिसा भाग खालून कोसळला असून समुद्राच्या लाटांमुळे भविष्यात संपूर्ण तटबंदी ढासळण्याचा धोका उदभवू शकतो. विजयुदुर्ग किल्ला हा एक एैतिहासिक किल्ला असून या किल्ल्यावरती दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. मात्र सतत होणारी पडझड पाहता भविष्यात या किल्ल्याचं नाव असेल. मात्र प्रत्यक्षात किल्ला नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची भीती किल्ल्याप्रेमींनी व्यक्त करत आहेत.

दोन वर्षापुर्वी विजयदुर्ग किल्ल्याच्या तुटक्या बुरजा जवळील तटबंदी ढासळलेली होती. यावेळी अनेक राजकीय लोकांनी व लोकप्रतिनिधींची पाहणी करुन सदर किल्ल्याची डागडुजी केली जाईल, असे आश्वासन देखील दिले होते. मात्र या किल्ल्याची पाहणी करायला आलेले लोकप्रतिनिधींनी शासन दरबारी कोणताही आवाज उठविला नसल्याने आजपर्यंत त्या बुरुजाची डागडुजी केलेली नाही. माजी खासदार संभाजीराजे यांनीही विजयदुर्ग किल्ल्याची दोन वर्षापुर्वी तटबंदी ढासळली त्यावेळी प्रत्यक्ष येवून पाहणी केली होती.

असा आहे विजयदुर्गचा इतिहास

विजयदुर्ग किल्ल्यावर 1653 पासून 1818 पर्यंत मराठ्यांचे वर्चस्व होते. विजयदुर्ग किल्ला 820 वर्ष प्राचीन आहे. हा किल्ला इ. स. 1193 ते 1206 मध्ये राजा भोज यांनी बांधला. कारण त्यावेळी राजा भोज यांचे कोकण प्रांतावर वर्चस्व होते. या किल्ल्यावर विजयनगराचे सम्राट, बहामनी सुलतान आणि विजापूरच्या आदिलशहाने राज्य केले. 1653 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्ल्यावर हल्ला करून हा किल्ला आदिलशहाकडून आपल्या ताब्यात घेतला. त्यावेळी विजयदुर्ग किल्ल्याला पूर्वीच्या काळी घेरीया या नावाने ओळखले जायचे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकण्याच्या अगोदर पाच एकरच्या क्षेत्रफळा मध्ये वसलेला होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला तटबंदी वाढवून या किल्ल्याचे क्षेत्रफळ 17 एकर केले. सध्या 17 एकरवर किल्ल्या आहे, मात्र त्याची पडझड होत आहे.

विजयदुर्ग किल्ला जलदुर्ग प्रकारातील आहे. या किल्ल्याच्या तिन्ही बाजूने पाणी आणि एका बाजूने जमीन आहे. जमिनीवरून किल्ल्यामध्ये प्रवेश करता येतो. 30 मीटर उंच खडकावर या किल्ल्याची तटबंदीची भींत 300 फूट उंच आहे. किल्ल्याची भींत ही 10 मीटर उंच आहे. समुद्राच्या जवळची तटबंदी म्हणजे पडकोट खुश्की, दुसरी तटबंदी बुराजांच्या भोवती आणि तिसरी तटबंदी किल्ल्याच्या भोवती आहे. अश्या तीन तटबंदी या किल्ल्याला आहेत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129