
18 हजार पोलिसांच्या भरतीची प्रक्रिया आजपासून झाली सुरू
MH 28 News Live : महाराष्ट्रातील अनेक तरुण-तरुणी गेल्या दोन वर्षांपासून पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. ही प्रतीक्षा संपली असून राज्यातील 18000 पोलीस भरतीचा मार्ग अखेर मोकळ झाला आहे.
या भरतीला आज 9 नोव्हेंबर 2022 बुधवारपासून सुरुवात होणार आहे. गेल्या आठवड्यात प्रशासकीय कारण देत पोलीस भरतीला स्थगिती देण्यात आली होती. यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रोजगार मेळाव्यात आठवड्याभरात पोलीस भरतीच्या प्रक्रियेला सुरूवात होईल असे सांगितले होते. यानंतर आता बुधवार 9 नोव्हेंबरपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे.
भरतीच्या नियमांमध्ये मोठा बदल
पोलीस भरती प्रक्रियेच्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या नव्या बदलांनुसार उमेदवारांना प्रथम शारीरिक चाचणी (Ground Exam) परीक्षा पास करावी लागेल. मैदानी परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी लेखी परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. याआधी लेखी त्यानंतर मैदानी चाचणी घेतली जायची. यंदाच्या भरतीला मात्र पहिले प्राधान्य मैदानी चाचणीला देण्यात आले आहे.
कोरोनाच्या काळात 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत ज्या उमेदवारांची वयाची कमाल मर्यादा पूर्ण झाली, अशा सर्व प्रवर्गातील उमेदवारांना या निर्णयामुळे एक संधी मिळणार आहे. 2020 आणि 21 या वर्षात रिक्त पदे भरण्यासाठीच्या भरती प्रक्रियेसाठी एकवेळची उपाययोजना म्हणून हे उमेदवार पात्र असतील. शुक्रवारी गृहविभागाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button