अफजलखानाच्या कबरीवरचे बेकायदेशीर बांधकाम पडायला झाली सुरुवात
MH 28 News Live : अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पाडण्यात सुरुवात करण्यात आलं आहे. प्रतापगडाच्या पायथ्याजवळ अफजल खानाची कबर आहे.
गुरुवारी सकाळीच स्थानिक प्रशासनाकडून जेसीबीच्या सहाय्यानं अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरूवात करण्यात आलीय. अफजल खानाच्या कबरीच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अनधिकृत बांधकाम पाडताना माध्यम प्रतिनिधी आणि स्थानिकांना कबर परिसरापासून 6 ते 7 किलोमीटर दूर हटवण्यात आलंय. अफझान कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे कोर्टानं दिले होते आदेश. कोर्टाच्या आदेशाची आता प्रशासनाकडून अंमलबजावणी करण्यात आलीय.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button