राजपथावर यंदा अवतरणार साडेतीन शक्तीपीठे. गणराज्य दिनाच्या पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ होणार सहभागी
MH 28 News Live : माणसाला संकटातून पार पडण्याची ‘महाशक्ती’ असलेल्या महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन पीठांचे दर्शन २०२३ च्या गणराज्यदिनाच्या संचलनात होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. महाराष्ट्राच्या चित्ररथाबाबत संरक्षण मंत्रालयाने संबंधितांना काही सूचना केल्या असून अंतिम सादरीकरण झाल्यावर आगामी प्रजासत्ताकदिनी जे चित्ररथ संचलनात सहभागी होतील त्याची अंतिम यादी आगामी दोन ते तीन दिवसांत जाहीर करण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले.
राज्याने यंदा एकूण ८ विषयांवरील चित्ररथांचा प्रस्ताव दिला होता त्यातील ‘त्रिशक्ती’ विषय केंद्राच्या पसंतीस उतरला असून राज्याचा चित्ररथ कर्तव्यपथावर झळकणार हे जवळपास निश्चित मानले जाते.
सरकारने राजपथाचे नामकरण कर्तव्यपथ असे केल्यावर होणाऱया २०२३ च्या पहिल्याच प्रजासत्ताकदिन संचलनात राज्याचाही चित्ररथ असणार याची शक्यता बळावलीआहे. महाराष्ट्राने आगामी प्रजासत्ताकदिनाच्या संचलनासाठी राज्यातील तीन शक्तीपीठांचा महिमा वर्णन करणाऱया देखाव्याची निवड केली आहे. कोल्हापूर, तुळजापूर, माहूर व वणीची सप्तशृंगी देवी या पीठांचे महात्म्य या चित्ररथाच्या माध्यमातून गीतसंगीताच्या माध्यमातून राजपथावर उलगडेल.त्याबरोबरच स्त्रीशक्तीचाही जागर होईल. सुरवातीला यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाचा संचलनात समावेश नव्हता. सूत्रांच्या माहितीनुसार ‘कर्तव्यपथा’वरील पहिल्याच राज्यातील भाजप उच्चपदस्थांनी दिल्लीतील ‘महाशक्ती’बरोबर तातडीने संपर्क साधला. त्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथसिह यांच्या पातळीवर हालचाली होऊन संरक्षण मंत्रालयाच्या याबाबत दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीला महाराष्ट्राला निमंत्रण देण्यात आले. या बैठकीत राज्याच्या चित्ररथाचे सादरीकरण झाल्यावर त्याबाबत काही दुरूस्त्या करण्याच्या सूचना करण्यात आल्या. विशेषतः या देखाव्याबरोबर देवीचा जागरण-गोंधळ सादर करणाऱया काही लोककलाकारांचा समावेश करावा अशी सूचना करण्यात आली. या दुरूस्त्यांनंतर राज्याच्या चित्ररथच्या समावेशाबाबतची अनिश्चितता समाप्त होईल असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button