
पत्रकार वारिशे यांच्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा – अमडापूर आणि उदयनगर येथील पत्रकारांची मागणी
MH 28 News Live, उदयनगर : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा अमडापूर व उदयनगर येथील पत्रकारांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. या संदर्भात अमडापूर पो स्टे चे ठाणेदार यांना १२ फेब्रुवारी रोजी निवेदाद्वारे हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी तसेच पत्रकारांची होणारी मुस्कटदाबी थांबवावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा कायमचा दाबण्याचा प्रयत्न केला जातो पत्रकावर हल्ले करुण किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतांना दिसत आहे. वास्तविक पाहता पत्रकार संरक्षण कायदा अस्तांना मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करण्यासही टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे पत्रकारांना निष्पक्ष पत्रकारिता करणे कठीण झाले आहे.
यावेळी निवेदन देताना वसंता शिरसाट, प्रताप कौसे, अम्रपाल वाघमारे, जिया काझी, दिलीप हतागळे, रफीक खान, सतीश पैठणे, रघुनाथ गवई, माधव दुंधाळे,कैलाश देशमुख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button