♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सावधान…! ऑनलाइन गेमच्या नादात जालना जिल्ह्यातल्या तरुणाने ४० लाख गमावले आणि जमिनही विकावी लागली

MH 28 News Live : कोरोना काळात मुलं घरात बसली आणि मोबाईलच्या वापर अधिक होऊ लागला. आधी ऑनलाइन अभ्यास, ऑनलाइन लेक्चर पाहाता पाहाता मुलं ऑनलाइन गेमच्या नादी लागली. सध्या मुलं ऑनलाइन जुगाराच्या नादी लागून आर्थिक नुकसान करुन घेत असल्याचं चित्र आहे. ऑनलाईन जुगाराला बळी पडून आपल्या वस्तू, घरदार, शेती-वाडीही गहाण टाकत आहेत. जालना जिल्ह्यात असाच धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरुणाने ऑनलाइन गेममुळं तब्बल ४० लाख रुपये गमावले आहेत.

ऑनलाईन गेमच्या नादात एका तरुणाने तब्बल ४० लाख रुपये गमावल्याचा प्रकार जालना जिल्ह्यातल्या ढगी गावात घडला आहे. परमेश्वर केंद्रे असं या तरुणाचं नाव असून ऑनलाइन गेमच्या वेडापायी त्याला शेत जमीनही विकावी लागली आहे. गेल्या वर्षभरापासून परमेश्वरला मॉस्ट बेट नावाचा गेम खेळण्याची तलफ लागली. ऑनलाइन गेम खेळत असताना सुरुवातीला १००, ५०० आणि हजार रुपयांनी हा गेम खेळायला सुरुवात केली. खेळात नवीन असल्याने सुरुवातीला त्याला पैसेही मिळू लागले. घरी आरामात बसून मोबाईलवर पैसे मिळू लागल्याने ते. मग त्यांने खेळात १००, २००, ५०० रुपये गुंतवण्यास सुरुवात केली. पण हळूहळू हे पैसे सगळे डुबत गेले. हजार पाच हजारांचा आकडा कधी लाखांच्या पार गेला हे त्यालाही कळलं नाही.

जवळचा पैसा संपला तसे त्याने उसने पैसे घेण्यास सुरुवात केली. शेवटी हतबल झालेल्या परमेश्वरने आपली शेत जमीनही विकली. वर्षभरात या व्यासानापायी त्याचे ऑनलाइन गेममध्ये ४० लाख रुपये डूबले. मॉस्ट बेट हा गेम एका परदेशी कंपनीनं तयार केला आहे. त्याला भारतात खेळण्यास परवानगी नाही. प्ले स्टोअरवर हा गेम उपलब्ध नसून तो खेळणाऱ्याला लिंकद्वारे डाऊनलोड करावा लागतो. यामध्ये गेमिंगचे अनेक प्रकार आहेत.

सुरुवातीला हा खेळणाऱ्याला बोनसचं अमिष दाखवून गेम खेळण्यास भाग पाडतो आणि खेळणारा आपणहून या गेमच्या आहारी जाऊन सर्वस्व गमावून बसतो. या गेमच्या नादात आपली शेत जमीन हातची गेल्यावर कुठे परमेश्वरचं डोकं ताळ्यावर आलं. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच परमेश्वरने थेट पोलिसात धाव घेतली. मात्र गुन्हा दाखल करून न घेता सायबर पोलिसांनी त्याला बँक स्टेटमेंट आणण्याचा सल्ला दिला.

जालना जिल्ह्यातल्या या छोट्याशा गावात ३५ ते ४० मुलं या ऑनलाइन गेमचे बळी पडले आहेत. या गावातील तरुण पोरं वेगवेगळ्या पद्धतीचे ऑनलाईन गेम खेळतात. त्यात अनेकांचे खिसे रिकामे करून झाले आहेत. परमेश्वरनी ऑनलाइन गेमच्या नादात त्याची रस्त्यालगत असलेली शेत जमीन विकली असून सध्या त्याची परिस्थिती हलाखीची आहे. गावातच एका छोट्या टपरीवर त्याच्या घरचा उदरनिर्वाह भागतोय. या व्यसनापाई राजाचा रंक झाल्याचं त्याला आता कळू लागलं आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129