
ग्राम रोजगार सेवकांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
MH 28 News Live, बुलडाणा : विविध मागण्यांसाठी ग्राम रोजगार संघटनेच्यावतीने २७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
ग्राम रोजगार सेवकांना विमा संरक्षन दयावे, महाराष्ट्रातील ग्रामरोजगार सेवक व संघटना एकत्रीकरण करण्यात यावे, आकृतीबंधामध्य समायोजन करून शासकिय सेवेत समावेश करावा, किमान वेतन कायदयाअंतर्गत वेतन मिळावे, वैयक्तीक खात्यात मानधन जमा करावे, नेटपॅक सह अँड्राईड मोबाईल दयावा यासह आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले असून, विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
आंदोलनात जिल्हाध्यक्ष मदन खरात, जिल्हा सचिव गजानन निळे, पृथ्वीराज गवई, ज्योतीराम इंगळे, दिपक गवई, संजय मोरे, भिमराव खराटे, दगडू यादव यांच्यासह सर्व ग्राम रोजगार सेवक संघटना बुलडाणा जिल्हा आदींनी सहभाग घेतला होता