♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर, सुरक्षेला धोका; केंद्र सरकारने केल्या ५.८ कोटी शिधापत्रिका रद्द

MH 28 News Live : एकीकडे जेव्हा भारतात पूर्व भारतातील वेगवेगळ्या राज्यातून मुख्य म्हणजे पश्चिम बंगाल मधून बांगलादेशी Rohingya वेगवेगळ्या मार्गे भारतात येऊन बनावट कागदपत्राद्वारे विविध योजनांचा लाभ घेत असल्याची माहिती येत आहे, दरम्यान या घुसखोरां विरोधात आणखी एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. प्राप्त माहिती नुसार केंद्रीय अन्न मंत्रालयाकडून ५ कोटी ८० लाख बनावट शिधापत्रिका रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. याच बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

Bangladesh आणि Manmar ( ब्रह्मदेश ) मधून बेकायदेशीरपणे India मध्ये घुसलेले रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर देशासाठी घातक बनत आहेत. ते केवळ बेकायदेशीरपणे देशात प्रवेश करून काम करत नाहीत, तर स्वत:ला या देशाचे रहिवासी असल्याचे सिद्ध करण्यासाठी Adhaar Card आणि Voter ID सारखी बनावट कागदपत्रे बनवत आहेत. यासाठी त्यांनी मृत झालेल्या व्यक्तींची ओळख घेण्यास सुरुवात केली आहे

रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर भारतातील विविध राज्यांमध्ये लपून बसले आहेत आणि त्यांची ओळख लपवण्यासाठी मरण पावलेल्या लोकांची ओळखपत्रे वापरत आहेत. हे घुसखोर या नावांनी आपला धंदा तर चालवत आहेतच पण बँकांमध्ये खाती देखील उघडली आहेत. एवढेच नाही तर, या बनावट कागद पात्रांचा वापर करून हीच घुसखोर जनता वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेत आहे.

डिजिटलायझेशन ड्राइव्ह सुरू केल्यानंतर अनेक बनावट रेशन कार्ड असल्याचे समोर आले. देशातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत (PDS) बरेच बदल झाले असून ५.८ कोटी बनावट शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत.

देशभरातील रास्त भाव दुकानांमध्ये ५.३३ लाख ई-पीओएस उपकरणे बसवण्यात आली आहेत. याद्वारे धान्य वितरणादरम्यान आधारद्वारे पडताळणीसह योग्य व्यक्तीपर्यंत रेशनचे वाटप करण्यात येत आहे. मंत्रालयाने सांगितले की, ‘आज एकूण धान्यांपैकी सुमारे ९८ टक्के धान्य आधार पडताळणीद्वारे वितरित केले जात आहे. यामुळे गैर-पात्र लाभार्थी दूर करण्यात आणि काळाबाजार कमी करण्यात मदत झाली आहे.यामुळे सिस्टीममधील बनावट कार्ड आणि चुकीच्या नोंदी नष्ट करताना खऱ्या लाभार्थ्यांना वितरण सुनिश्चित केले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129