♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चिखलीत आयशरची मोटरसायकलला धडक एक ठार एक गंभीर; आयशर चालकास अटक

MH 28 News Live / चिखली : दांडगे येथील दांडगे पेट्रोल पंपाजवळ काल दिनांक 14 जानेवारी रोजी झालेल्या रस्ते अपघातात आयशर ट्रॅक्टर चालकाने एका मोटरसायकलला धडक दिल्यामुळे मोटर सायकल स्वाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर त्याच्या साथीदार याला गंभीर दुखापट झाली आहे चिखली पोलीस आणि सदर आयशर ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.

संतोष आत्माराम लोखंडे वय (४५) रा. सातगाव भुसारी यांनी चिखली पोलिसांकडे दाखल केलेल्या फिर्यादीनुसार १४ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता गणेश प्रल्हाद पवार हा मिस्त्री काम करण्यासाठी मोटरसायकलने नेहमीप्रमाणे जात होता. त्याच्या सोबत असलेला सचिन दिनकर गायकवाड हा होता. चिखली रोड देव्हडे फॉर्म हाऊस समोर हा अपघात झालेला असून अपघातामध्ये गणेश पवार हा जागीच मरण पावला असून तसेच सचिन गायकवाड ह्यास गंभीर मार लागला आहे आयशर वाहन क्रमांक एच आर ३८ झेड ९४४८ चआ चालक गणेश पवार याचे मरणास कारणीभूत झाला.

प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार चिखली पोलिसांनी आरोपी आयशर चालकआविरैधात ४५/२०२५ कलम
२२८१,१२५ अ १२५ ब १०६, ३२४(४) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो हे का विजय प्रकाश गीते ब. न ३४१ हे करीत आहेत.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129