
लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या : चिखलीत खळबळजनक घटना
MH 28 News Live / चिखली : शहरातील गजानन नगर परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली असून ४० वर्षीय व्यक्तीने निंबाच्या झाडाला रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.

ही घटना २७ जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास नॅजरीन चर्चच्या पाठीमागे उघडकीस आली. मृत व्यक्तीचे नाव रामेश्वर मधुकर खरात (वय ४०) असे असून, त्याने रुमालाच्या सहाय्याने झाडाला गळफास घेतला होता. स्थानिक नागरिकांना मृतदेह दिसून येताच परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला माहिती दिली.
प्राथमिक अंदाजानुसार सदर आत्महत्या ही रात्रीच घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.



