
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लवकरच येऊ शकते खिसा गरम करणारी ही खूशखबर…
MH 28 News Live : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आता लवकरच DA मध्ये वाढ होणार आहे. तसेच पगारातही वाढ होणार असल्याची माहिती मिळत आहे. १ एप्रिल पासून याचा फायदा लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे.
सरकारने महागाई भत्त्यात ११ टक्के वाढ केली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नुकतीच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता ११ टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. आता मध्य प्रदेश राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. या धर्तीवर केंद्र सरकार देखील अशा प्रकारचा निर्णय आपल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घेण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकार लवकरच महागाई भत्ता वाढवू शकते
वृत्तानुसार, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना होळीपूर्वी डीएमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. केंद्र सरकारच्या कर्मचार्यांसाठी सरकारने ३ टक्के डीए वाढवण्याची घोषणा केली, तर केंद्रीय कर्मचार्यांना ३४ टक्के दराने भत्ता मिळेल.
सध्या त्यांना मूळ वेतनाच्या ३१ टक्के डीए मिळत आहे. या कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या पगारासह मागील दोन महिन्यांचा पगारही मिळू शकतो. १ कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्त्यात वाढीचा लाभ मिळणार आहे.



