♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

‘समृद्धी’नंतर आता शक्तिपीठ महामार्ग! 13 जिल्हे जोडणार; भूसंपादनासाठी प्रक्रिया सुरू

MH 28 News Live : राज्यातील सर्व शक्तिपीठांना जोडणारा नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग प्रस्तावित असून, या महामार्गाने किनवट तालुका देशाच्या नकाशावर येणार आहे.

राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रस्तावित केलेला हा महामार्ग राज्यातील १३ जिल्ह्यांतून जाणार आहे. माहूर, औंढा नागनाथ, अंबाजोगाई, परळी, तुळजापूर, पंढरपूर, नरसोबाची वाडी, कोल्हापूर या प्रमुख धार्मिक स्थळांना तो जोडला जाणार आहे. हा प्रस्तावित एक्स्प्रेस वे श्रीक्षेत्र माहूर येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१ ए ला जोडला जाणार आहे.
या महामार्गाच्या जमीन संपादनासाठी सल्लागार समितीची स्थापना झाली आहे. हा महामार्ग श्रीक्षेत्र माहूरला जोडल्यानंतर सारखणी, मांडवी, पिंपळगाव, आदिलाबाद या आंतरराज्य रस्त्यांचे महत्त्व वाढणार आहे.शिवाय भारतातील प्रमुख राष्ट्रीय महामार्ग असलेल्या कन्याकुमारी ते काश्मीर (क्र. ४४) या मार्गाला जोडला जाणार असल्याने किनवट तालुक्याचे महत्त्व वाढणार आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129