
कैलासराव शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त चिखलीत मोफत नेत्र तपासणी शिबिर व चष्मे वाटप
MH 28 News Live / चिखली : रेणुकामाता स्कूल अँड ज्यु. कॉलेज, भालगावचे अध्यक्ष, शिक्षण प्रसारक मंडळ, चिखलीचे सहसचिव तथा विद्या भारतीचे जिल्हाध्यक्ष कैलासराव शेटे यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली शहर व परिसरातील नागरिकांसाठी भव्य मोफत नेत्ररोग तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत माऊली नेत्रालय, स्टेट बँकेच्या बाजूला, छत्रपती शिवाजी महाराज चौक, चिखली येथे होणार आहे. शिबिरात नेत्रतज्ज्ञ डॉ. पंकज शेटे (एम.एस. नेत्ररोग, शालाक्यतंत्र) यांच्याकडून रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
मोफत तपासणीसह चष्मावाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा
या शिबिरामध्ये गरजू रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार मोफत चष्मावाटप तसेच मोतीबिंदूच्या रुग्णांसाठी ऑपरेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे चिखली शहर व परिसरातील नागरिकांनी, विशेषतः नेत्रविकार असलेल्या गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. या शिबिराचे आयोजन इंजि. वैभव शेटे यांनी केले असून, नागरिकांनी अधिक माहितीसाठी ९८२२७३२५३३ किंवा ८९८३६५६१०४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



