♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मनसेच्या मागणीने चिखली उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञांची नियुक्ती

MH 28 News Live, चिखली : येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये स्त्री रोग तज्ञाची कायमस्वरूपी नेमणूक नसल्यामुळे आलेल्या महिला रुग्णांना त्रास सहन करावा लागत असे. या गोष्टीची दखल घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक यांना एक निवेदन सादर करण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेऊन चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये स्त्रीरोग तज्ञाची नियुक्ती करण्यात आली आहे; त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या महिलांची एक मोठी समस्या दूर झाली आहे.


संपूर्ण तालुक्यातील महिला स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येतात. माञ गरोदर महिलांना तपासणीसाठी या ठिकाणी स्त्री रोगतज्ञ डॉक्टर नसल्याकारणामुळे रुग्णांची गैरसोय होत होती. रुग्णांना बुलढाणा, अकोला येथे पाठविल्या जात होते. सर्व सुविधा उपलब्ध असताना सुद्धा स्त्री रोगतज्ञ डॉक्टर अभावी महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, मनविसे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कापसे, मन शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, बुलढाणा तालुकाध्यक्ष अमोल रिंढे, चिखली शहराध्यक्ष नारायण देशमुख, चिखली उप तालुकाध्यक्ष संदीप नरवाडे तालुका सचिव प्रवीण देशमुख, यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भुसारी यांची भेट घेऊन उपजिल्हा रुग्णालय चिखली येथे स्त्री रोग तज्ञ डॉक्टर उपलब्ध करून द्यावे अशी निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्या अनुसरून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भुसारी यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालय देऊळगाव मही येथे कार्यरत असलेले डॉ. उमेश सावजी यांना चिखली येथील पदभार सोपविला असून नियमित उपस्थीत राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात मनसे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे व त्यांच्या सहकाऱ्यांची केलेल्या विवीध कार्यामुळे दिवसागानिक प्रशंसा केली जात आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129