♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

धुपेश्वर पुलावर रक्तरंजित हल्ला; एका तरुणाचा मृत्यू, चौघे आरोपी जेरबंद

MH 28 News Live / मलकापूर : प्रसिद्ध तीर्थस्थळ मलकापूरजवळील धुपेश्वर परिसर बुधवारी रात्री रक्तरंजित हल्ल्याने हादरला. टोळीतील तरुणांनी शेतकऱ्यांच्या मुलांवर धारदार शस्त्रांनी हल्ला करून एकाचा जागीच खून केला, तर एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून दसरखेड पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे.

मलकापूर तालुक्यातील धुपेश्वर येथील पुलावर बुधवारी रात्री उशिरा ही भीषण घटना घडली. सतीश गजानन झाल्टे (मृत) आणि अविनाश जितेंद्र झाल्टे (गंभीर जखमी) या दोघांवर सुमारे १२ जणांच्या टोळीने चाकूने सपासप वार केले. किरकोळ कारणावरून कुरा येथे झालेल्या वादातून या हल्ल्याचा बीजरोप झाला. आरोपींनी पुलावरच दोघांना गाठून निर्दयपणे हल्ला चढवला. सतीशच्या पोटात वार झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर अविनाश गंभीर जखमी अवस्थेत सापडला.

चार आरोपी जेरबंद, अजूनही शोध सुरू

घटनेनंतर दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून काही तासांतच चार आरोपींना अटक केली. देवा ठाकुर, संकेत पालवे, सौरभ पालवे आणि अरविंद उर्फ गब्बर सोळंके अशी आरोपींची नावे असून ते सर्व विशीतील असल्याचे समजते. आणखी काही आरोपी या प्रकरणात सामील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी जखमी अविनाशला मुक्ताईनगर व नंतर जळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवले आहे.

रुग्णालयाबाहेर तणाव, पोलिसांचा कडक बंदोबस्त

घटनेनंतर मृत युवकाचे नातेवाईक व नागरिक मोठ्या संख्येने मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात जमा झाले. तणावपूर्ण वातावरण पाहता पोलिसांनी ठाणेदार गिरी व निरीक्षक हेमराज कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त तैनात केला. दरम्यान, या हत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी दसरखेड पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. धुपेश्वरसारख्या शांत परिसरात घडलेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून या खुनाचा उलगडा लवकरात लवकर व्हावा, अशी मागणी होत आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129