♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

दानवे यांनी दिली राज ठाकरेंच्या घरी सदिच्छा भेट. दोघांमध्ये झाली विविध विषयांवर चर्चा

MH 28 News Live, मुंबई : भारत सरकारचे रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे आज मुंबई दौऱ्यावर होते. रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांशी बैठका, सुरु असलेल्या अनेक विकास कामांचा आढावा यात महत्त्वाची ठरली ती मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतिर्थ या निवासस्थानी झालेली भेट.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची लवकरच म्हणजे अर्थसंकल्पिय आधिवेशन संपल्यावर मी भेट घेणार आहे, असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीत काही दिवसांपुर्वी सांगितले होते. अखेर रावसाहेब दानवे यांनी आज मुंबईत शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली.

विशेष म्हणजे मनसेचे निवडणूक चिन्ह हे रेल्वे इंजिन आहे, त्याच रेल्वे खात्याचे दानवे हे राज्यमंत्री असल्याने त्यांनी राज ठाकरे यांना रेल्वे ईंजिनाची प्रतिकृती भेट दिली. रेल्वे संदर्भातील व अन्य विषयावर दोघांमध्ये चर्चा झाली.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129